Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'सुप्रिया सुळेंच्या उपस्थितच सत्तेत जाण्याच ठरलं...', राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

म्हणून पवारांना विचारलं नाही.. अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवारांच्या सहभागाशिवाय नेते असं करणार नाहीत असं काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत. (Latest Marathi News)

तर या सर्व घडामोंडीवर राष्ट्रवादीच्या आमदारानेच भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. 'टीव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.(Latest Marathi News)

'सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं', असंही सुनील शेळके यांनी म्हंटलं आहे. ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

पहिल्यांदा ही बैठक प्रदेशाध्यक्ष पदासाठीची आहे असं बोललं गेलं. ही बैठक केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी झाली नाही असं सुनील शेळके यांनी म्हंटलं आहे.

तर सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेदेखील होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ हे नेतेही होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला, असं सुनील शेळके यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

अजित पवारांनी आम्हाला बोलवून घेतलं. सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं. भाजपसोबत जाण्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी, लोकहिताची कामं करण्यासाठी आपण सत्तेत असणं महत्वाचं असल्याचं सांगितलं. सत्तेत राहण्यासाठी आम्ही सह्या दिल्या, असं सुनील शेळके यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

त्याच दिवशी दुपारी अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीत कोणताही गटातट नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी आहे आणि यापुढेही असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT