महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

संतोष कानडे

मुंबईः आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ट्विटदेखील केलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे.

यासह उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT