uddhav thackeray and narendra modi
uddhav thackeray and narendra modi 
महाराष्ट्र

Shiv Sena : 'मविआ'तून बाहेर पडतो, असा शब्द मोदींना देऊन ठाकरे परतले होते' केसरकरांचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये आठ महिन्यापूर्वी सत्तासंघर्षाचं नाट्य रंगलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंड केलं. परंतु त्यापूर्वी झालेल्या एका बैठकीबद्दल दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे.

शिवसेनेतले ४० आणि इतर १० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला. शिंदेंना उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळेल, अशी शक्यता असतांनाच ऐनवेळी भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं. या सत्तासंघर्षातले दावे-प्रतिदावे रोजच ऐकायला मिळतात.

ठाकरे गटाचे नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितलं की, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हालाच मुख्यमंत्री करु, फक्त तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा; असं स्पष्ट केलं होतं. परंतु त्यांनी ऐकलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या एका बैठकीबद्दल केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची मी स्वतः पंतप्रधानांसोबत बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबुल केलं होतं. परंतु माघारी आल्यानंतर त्यांनी तसा निर्णय घेतला नाही.

केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही गुवाहटीला गेल्यानंतर मी त्यांना बोललो होतो की, आजही तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी; आम्ही मुंबईला येऊ. परंतु तेव्हाही त्यांनी आमचं ऐकलं नाही.

हेही वाचा: Narendra Modi : 'तुम्ही कितीही वाढवा दाढी.. लै मजबुत मोदींची बॉडी' अन् सभागृहात एकच हशा पिकला

'शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निर्णय प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं कोर्टात किंवा आयोगामध्ये सादर करावं. परंतु ते सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत' असा आरोप दीपक केसरकरक यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT