Anil Parab will not give up Anil Parab will not give up
महाराष्ट्र बातम्या

‘अनिल परब हे हार मानणार नाही; तुम्हाला जिंकूही देणार नाही’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्या घरी गुरुवारी (ता. २६) सकाळी ईडीने छापे (ED action) टाकले आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानासोबत संबंधित सात ठिकाणावर छापे टाकले आहेत. त्यानंतर अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही ईडीने छापा टाकला. अनिल परब यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचे शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या. (Anil Parab will not give up)

अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक संजय कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या घरी सकाळीपासून ईडीचे (ED action) अधिकारी पोहोचले होते. कदम यांच्या घरी त्यांना मोठा मुद्देमाल हाती लागला होता. याअगोदर अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते.

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या घरी ८ कोटी सापडले होते. मात्र, त्यांच्यावर इडीची कारवाई करण्यात आली नाही. याउलट परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनिल परबांवरील कारवाई सूडबुद्धीने केली आहे. अनिल परब हे हार मानणार नाही. तुम्हाला जिंकूही देणार नाही. आमचे नेते सर्व गोष्टींना समोर जाण्यास तयार आहे, असेही दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या.

सत्तेसाठी दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची धाड टाकायची आणि त्रास द्यायचा. दुसरं काहीही करीत नाही आहे. कधीपर्यंत हे चालणार माहिती नाही आहे. यातून काहीही मिळत नाही, तरीही हा प्रकार सुरू आहे, असेही दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT