Deepali Sayyad Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Deepali Sayyad : एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् कमळाची रांगोळी काढली; राजकीय भूमिका चर्चेत

दीपाली सय्यद यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची राजकीय भूमिका सातत्याने चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली आणि आता त्यांनी काढलेली कमळाची रांगोळी चर्चेत आली आहे.

दीपाली सय्यद यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दीपाली सय्यदही ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंविषयीची आपल्या मनातली खदखदही व्यक्त केली होती. उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही, मधले लोक भेटू देत नाहीत, अशा आशयाचं विधानही दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

त्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी दिवाळीच्या निमित्ताने काढलेली रांगोळी चर्चेचा विषय ठरत आहे. दीपाली सय्यद यांनी घरी कमळाची रांगोळी काढली आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत दीपाली सय्यद यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता दीपाली सय्यद भाजपामध्ये जाणार की काय, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Volkswagen Layoffs 2026: Volkswagen मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात; आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कारचे मॉडेलही निम्मे होणार; नेमकं प्रकरण काय?

Maratha Reservation: मनाेज जरांगेंच्या समर्थनार्थ मंगळवेढा कडकडीत बंद; शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प, प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट

Marathi News Live Updates : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Guru Gochar 2026 : गुरुचा नक्षत्रात बदल! 'या' 4 राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी; प्रचंड धनलाभाचे संकेत

Navi Mumbai: मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू, कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोन परिचारिका निलंबित

SCROLL FOR NEXT