Kankavli Bank Election
Kankavli Bank Election Esakal
महाराष्ट्र

कणकवलीत सेनेला धक्का; सावंत यांचा पराभव, भाजपचे विठ्ठल देसाई विजयी

-विनोद दळवी, तुषार सावंत

ओरोस : कणकवली (Kankavli Bank Election)जिल्हा बँक निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश (Satish Savant)यांना पराभवाचा धक्का बसला असून भाजपचे विठ्ठल देसाई हे चिठ्ठीवर विजयी झाले आहेत. शेती विकास संस्थेच्या आठ पैकी प्रत्येकी चार जागा विकास आघाडी आणि भाजपच्या पदरात पडल्या आहेत. त्यामुळे उर्वरित निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर कणकवलीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता होती. मात्र, 36 पैकी 35 टक्के मतदान झाले. 35 मतदानापैकी एक मतपत्रिका कोरी होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 17 मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकून निकाल जाहीर केला. या चिठ्ठीमध्ये विठ्ठल देसाई यांचे नशीब फळफळले आहे. या खेपेस सतीश सावंत यांना विकास आघाडीचे नेते म्हणून मोठी जबाबदारी दिली होती, मात्र भाजपच्या दिग्गज आणि त्यांना पराभवाला सामोरे जाण्यास भाग पडले. हा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार बाहेर पडले त्यामुळे भाजपच्या गोठ्यामध्ये जबरदस्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भाजप व शिवसेना (BJP,Shivsena) पुरस्कृत पॅनेलमध्ये पहिल्या फेरीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)पॅनेल प्रमुख सतीश सावंत (Satish Savant) व भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई (Vitthal Desai) यांच्यात टाय झाली आहे. त्यामुळे हा निकाल चिठ्ठीद्वारे काढला जाणार आहे. तर संतोष परब (Santosh Parab)यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनीष दळवी (Manish Dalvi) सुद्धा विजयी झाले आहेत. आतापर्यंत ७ जागांचा निकाल लागला असून, यामध्ये भाजप तीन, महाविकास आघाडी ३ विजयी झाले आहे. एक जागा टाय झाली आहे. विजयी उमेदवार दिलीप रावराणे, प्रकाश बोडस, मनीष दळवी हे भाजपचे तर विद्याप्रसाद बांदेकर, व्हिक्टर डांटस, गणपत देसाई हे आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सतीश सावंत व विठ्ठल देसाई यांच्यात टाय झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT