देगलूर- बिलोली पोटनिवडणूक
देगलूर- बिलोली पोटनिवडणूक 
महाराष्ट्र

देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अभय कुळकजाईकर

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील देगलूर- बिलोलीचे कॉँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झाले. त्यामुळे आता या ठिकाणी पोटनिवडणुक होणार असून त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची मांदियाळी झाली असून या निमित्ताने कॉँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस या दोन माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील मतदारसंघाच्या पुर्ऩरचनेत २००९ मध्ये देगलूर बिलोली हा मतदारसंघ राखीव झाला आणि पहिल्या निवडणुकीत २००९ मध्ये कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे विजयी झाले. दोन वर्षापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. श्री. अंतापूरकर यांनी २००९ आणि २०१९ मध्ये श्री. साबणे यांचा पराभव केला तर श्री. साबणे यांनी २०१४ मध्ये श्री. अंतापूरकर यांचा पराभव केला होता. गेल्या जवळपास सव्वा वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्यातच आमदार अंतापूरकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणुक होणार असल्यामुळे अनेकांनी त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.

हेही वाचा - वसमत तालुक्यातील वाळूघाटाजवळ ठेवलेला चार हजार २४८ ब्रास वाळूसाठा तहसीलदार अरविंद बेळंगे यांच्या पथकाने जप्त केला आहे

मध्यंतरीच्या काळात भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा केला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी मुक्कामी थांबून भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील नांदेडला येऊन बिलोली, देगलूर भागाचा दौरा केला. भाजपच्या वतीने चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

भाजपची एकीकडे चाचपणी सुरु झाल्यानंतर दुसरीकडे कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील गेल्या आठवड्यात बिलोली, देगलूरचा दौरा केला. त्याचबरोबर विविध विकासकामांची उद्‍घाटने करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्हा हा कॉँग्रेसचा आणि अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे त्यावर पकड ठेवण्यासाठी श्री. चव्हाण यांचे प्रयत्न सुरुच आहेत. आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपणार असल्‍याचे चित्र आहे.

येथे क्लिक करा - *तिनं त्यात कंगणाचा एक संवाद म्हणून दाखवला आहे.

महाआघाडीची भूमिका अन् पंढरपूर पॅटर्न

पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाआघाडीवर मात करत ती जागा खेचून आणली. त्यामुळे देगलूर- बिलोलीतही पुन्हा पंढरपूर पॅटर्न करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यावर महाआघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सदरील जागा कॉँग्रेसची असल्याने त्यांचा दावा आहे तर दुसरीकडे शिवसेनेने जागा लढविल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आणि माजी आमदार सुभाष साबणे हे काय निर्णय घेणार? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा निर्णय काय राहणार आणि देगलूर- बिलोलीतील विविध प्रमुख पक्षातील स्थानिक नेतेमंडळी कोणती भूमिका निभावणार? यावरही बरेच काही अवलंबून आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT