Shraddha Murder Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Shraddha Murder Case: धक्कादायक! हत्येनंतर आफताबने श्रद्धाचा चेहरा जाळला?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे ही घटना किती क्रूर पद्धतीने घडली, हे स्पष्ट होतंय.

आफताबने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे साठवण्यासाठी त्याने फ्रिजदेखील खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून आफताबने चक्क तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून सध्या आफताबची कसून चौकशी सुरु आहे. त्यातून नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अद्यापही श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. दिल्ली पोलिस महरौली जंगलामध्ये मृतदेहाचे तुकडे आणि इतर पुरावे सापडत आहेत.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

दरम्यान, पोलिस श्रद्धाच्या अवयवांची तपासणी करत आहेत. परंतु अद्याप तिचे शीर आणि अवयव कापलेला चाकू आणि इतर समान सापडले नाही. अशातच आफताब खोटी माहिती देऊन फसवणूक करू शकतो, यामुळे पोलिसांनी आरोपी त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली होती.

या घटनेची क्रूरता आणि वास्तव पाहता ही नार्को टेस्ट महत्वाची मानली जात आहे. यामधून बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. आफताबच्या नार्को टेस्टसाठी दिल्लीच्या साकेत कोर्टाने परवानगी दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

तासन्तास शॉवर चालू ठेवून मृतदेह धुवायचा

सहा महिन्यांपूर्वी जेव्हा आफताबने श्रद्धाला मारलं तेव्हा त्याने पाण्याचा भरपूर वापर केल्याचं पोलिस तपासामधून पुढे येत आहे. तो तासन्तास शॉवर चालू ठेवून मृतदेह धुवायचा. रक्ताचा प्रत्येक डाग त्याने पाण्याने धुवून काढला. मे महिन्यामध्ये त्याने खूप जास्त पाण्याचा वापर केला. त्यामुळे त्याला त्या महिन्याचं बिल ३०० रुपये आलेलं. २० हजार लिटर मोफत मिळणारं पाणी संपवून त्याने जास्तीचं पाणी वापरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT