Delta plus virus sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नव्या 10 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद ; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (delta plus variant) नव्या 10 रुग्णांची नोंद (new patient) करण्यात आली असून येत्या काही काळात डेल्टा प्लस व्हेरिएंट राज्याची चिंता वाढवणारा (impactful virus) ठरु शकतो. आतापर्यंत डेल्टा प्लसमुळे 5 जणांचा मृत्यू (delta plus virus death) झाला असून एकूण 76 रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे (health department) नोंद झाली आहे.

नव्याने सापडलेल्या 10 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोल्हापूर, 3 रत्नागिरी, 1 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आहेत. हे 10 ही रुग्ण कोविड आजारातून बरे झालेले आहेत. या 76 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 पुरुष आणि 2 महिला आहेत. 2 मृत्यू रत्नागिरीतील आहेत तर, प्रत्येकी 1 मृत्यू बीड, मुंबई आणि रायगडमधील आहेत. मृत्यू झालेले 5 ही रुग्ण 65 वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोघांनी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले होते. तर, दोघांनी कोणताही डोस घेतला नव्हता. तर एकाच्या लसीकरणाबाबत राज्याला माहिती उपलब्ध झालेली नाही. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. त्यानुसार, आतापर्यंत 76 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा   डेल्टा प्लस व्हेरिएंट एकूण रुग्ण

जळगाव 13

रत्नागिरी 15

मुंबई 11

कोल्हापूर 7

ठाणे 06

पुणे 06

पालघर,  रायगड प्रत्येकी 3

नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग प्रत्येकी 2

चंद्रपूर, अकोला, सांगली,  नंदुरबार, औरंगाबाद, बीड प्रत्येकी 1

एकूण 76

19 ते 45 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण -

सर्वाधिक 39 डेल्टा प्लस रुग्ण हे 19 ते 45 वयोगटातील आहेत. तर त्या खाली 46 ते 60 वयोगटातील 19 रुग्ण आहेत. 18 वर्षाखालील 9 बालके असून 60 वर्षांवरील 9 रुग्ण आहेत. आता पर्यंत राज्यात आढळलेल्या 76 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 37 पुरुष असून 39 स्त्रिया आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT