Deputy Chief Minister Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची अपडेट; 'या' ठिकाणी होणार बैठक

'मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं'

सकाळ डिजिटल टीम

सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

कोल्‍हापूर : मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पुण्याहून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नसल्याने संतप्त भावना व्यक्‍त करण्यात आल्‍या.

या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मुंबईत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सकल मराठा समाजाच्या मागणीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.

शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT