Deputy Chief Minister Devendra Fadnavis tweet after taking oath
Deputy Chief Minister Devendra Fadnavis tweet after taking oath Deputy Chief Minister Devendra Fadnavis tweet after taking oath
महाराष्ट्र

‘ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले...’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान ठेवून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी ट्विटही केले. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis tweet after taking oath)

‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.’ असे ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असताना भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री व्हावे असे म्हटले होते.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी अशी इच्छा वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेणार असल्याचे सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांच्या इच्छेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज फक्त दोघांचाचा शपथविधी झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ED अन् इतर तपास यंत्रणांना चपराक, काय दिला निर्णय?

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT