Ajit Pawar Twitter
महाराष्ट्र बातम्या

२५ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हा खोटा आरोप - अजित पवार

पुण्यात आतापर्यंत १ कोटी १७ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

दीनानाथ परब

पुणे: जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन (jarandeshwar sugar mill) होणाऱ्या आरोपांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी उत्तर दिलं. त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या साखर कारखाना (Sugar mill) खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची सर्व माहिती अजित पवारांनी सादर केली. महाराष्ट्रात ६५ साखर कारखाने चालवायला दिले किंवा विकले, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी साखर कारखान्याची विक्री आणि खरेदी करणाऱ्याचे नाव वाचून दाखवले.

"साखर कारखान्याबाबत वेगवेगळया यंत्रणांनी चौकशी केली. पण काहीही निषपन्न झालेलं नाही. साखर कारखान्याबाबत खोटी आकडेवारी सादर करुन आरोप केले गेले" असं अजित पवार म्हणाले. "काहींनी २५ हजार, १० हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आमचं सरकार जाऊन नवीन सरकार आलं. सीआयडी, एसीबीने चौकशी केली. त्यात काही गैरप्रकार झाला नसल्याचं त्यांना आढळून आलं" असं अजित पवार म्हणाले.

जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची सर्व कायदेशीर माहिती अजित पवारांनी दिली. याच कारखाना प्रकरणात अजित पवारांचे नाव येत आहे. ईडीने याच कारखान्यावर आणि या व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर छापेमारीची कारवाई केली होती.

पुण्यात आतापर्यंत १ कोटी १७ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पुण्यात उद्यापासून आठवडी बाजार सुरु होणार आहे. पुण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री; साकारणार भरतची भूमिका

Latest Marathi News Live Update : लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

India Test Cricket: भारतीय कसोटी क्रिकेटचे पाच मजबूत आधारस्तंभ निवृत्त; आता फक्त रवींद्र जाडेजा मैदानात

SCROLL FOR NEXT