Devendra Fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

"आमच्या बहिणींना दिलासा मिळणार" ; गॅस सिलिंडरची किंमत कमी झाल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया! PM मोदींचं केलं कौतुक

केंद्र सरकारने घरघुती गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेल्या कपातीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Bhalerao

LPG Price Reduced:नुकताचं केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या किमतीवर मोठा निर्णय घेण्यात आला. घरघुती सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केल्याची घोषणा केंद्रीय मंत्र्याकडून करण्यात आली. गॅसची किंमत २०० रुपयांनी कमी केल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे सर्व लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या या निर्णयाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोंडभरुन कौतुक केले. सरकारच्या या निर्णयामुळे गरिब भगिंनीना दिलासा मिळेल, असे फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारने घरघुती सिलिंडर बरोबरचं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरची सब्सिडी ४०० रुपये करण्यात आली आहे.

सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो की रक्षाबंधनाच्या पवित्र मुहुर्तावर बहिणींकरिता त्यांनी राखीची ओवाळणी दिलीये.आणि विशेषत: गॅस सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी करुन दिलासा दिला. उज्ज्वला योजनेची सब्सिडी ४०० रुपये असणार आहे. त्यामुळे आमच्या गरीब भगिनींना दिलासा यातून मिळणार आहे. त्यामुळे मी आदरणीय मोदींचे आभार मानतो."

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्व पक्षांकडून स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील या निर्णयाचे कौतुक केले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर महिलांमध्ये उत्साह बघायला मिळाला. सरकारच्या या निर्णयाने मध्यमवर्गीय आणि गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

Latest Marathi News Live Update: अशोक खरात यांना पण ठेचण्याचे काम सुरू, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही - चित्रा वाघ

वाढलेले केस, सुटलेलं पोट... स्वतःची बॅग स्वतःच घेऊन निघाला ९०चा सुपरस्टार अभिनेता, तुम्ही ओळखलंत का?

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT