solapur ujani dam solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

पालकमंत्री नसल्याने शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकला! उजनी धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर; महिन्यात कमी झाले पाच टीएमसी पाणी

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप झाले तरीपण कालवा सल्लागार समितीची बैठक कधी, याचा निर्णय झालेला नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते, पण पालकमंत्री अजून निश्चित नसल्याने ही बैठक लांबल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळ्याच्या शेवटी ११.२८ टक्के (१२३.२८ टीएमसी) भरलेले उजनी धरण सध्या ९५ टक्क्यांवर आले आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ११५.४८ टीएमसीपर्यंत आहे. सध्या सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून ते पाणी साधारणत: ८ जानेवारीला बंद केले जाणार आहे. औज बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर धरणाचे दरवाजे बंद केले जातील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा जानेवारी, मार्च व मे अशा तीन टप्प्यात तीनवेळा पाणी सुटेल, अशी आशा आहे. सध्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाण्याची गरज असून तशी मागणी देखील त्यांनी कळविली आहे. मात्र, शेतीला पाणी सोडण्यासंबंधीचा निर्णय तथा पाण्याच्या आवर्तनांचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अपेक्षित आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप झाले, तरीपण कालवा सल्लागार समितीची बैठक कधी, याचा निर्णय झालेला नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते, पण पालकमंत्री अजून निश्चित नसल्याने ही बैठक लांबल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगत आहेत. पालकमंत्र्यांच्या निवडी न झाल्यास आता थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मान्यता घेऊन शेतीला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी सोडले जाईल, असे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यात १०० टक्के पेरणी, आता पाण्याची प्रतीक्षा

सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून त्यात ज्वारी, मका, गहू या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्या पिकांना आता पाण्याची गरज असून हंगामी बागायत किंवा कोरडवाहू क्षेत्रावरील पिकांसाठी उजनीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे अनेकांच्या शेतातील ऊस कारखान्याला गेला असून त्यांनीही उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. १५ जानेवारीपूर्वी शेतीसाठी रब्बीचे पहिले आवर्तन सुटेल, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठकच न झाल्याने त्यांनीही आता तोंडावर बोट ठेवल्याची स्थिती आहे.

धरणातील सध्याचा पाणीसाठा

  • एकूण पाणी

  • ११५.४८ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ५१.८४ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ९५.४२ टक्के

  • भीमा नदीत सोडलेला विसर्ग

  • ६००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT