Sharad Pawar Devendra Bhuyar Sakal
महाराष्ट्र बातम्या

'गद्दारी'च्या आरोपामुळे देवेंद्र भुयार नाराज; शरद पवारांशी करणार चर्चा

संजय राऊतांनी पराभवाचं खापर अपक्षांवर फोडल्याने आपण नाराज असल्याचं भुयार म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

राज्यसभेच्या निवडणुकीचा काल निकाल लागला. या निकालामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याचं समोर आलं. तर शिवसेनेचे संजय पवार यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. संजय राऊतही थोडक्यात पराभवापासून बचावले. यानंतर संजय राऊतांनी अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचं सांगत त्यांच्यावर आरोप केले. यामुळे नाराज झालेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आज शरद पवारांची भेट घेणार आहे.

संजय राऊत यांनी गद्दारीचा आरोप केल्यानंतर देवेंद्र भुयारांनी हे आरोप फेटाळले होते. भुयार यांनी राऊतांच्या या आरोपांना प्रत्युत्तरही दिलं होतं. आपण सातत्याने महाविकास आघाडीच्या बाजूने असूनही, त्यांना मत देऊनही आपल्याला बदनामी सोसावी लागत आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीचे कर्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं भुयार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडे आपली कामं होत नाहीत, मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, अशी नाराजीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्याबद्दलही या भेटीत चर्चा होणार आहे. तसंच संजय राऊतांच्या आरोपांबद्दल भुयार शरद पवारांशी बोलणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

‘सिरप’ची घातकी उबळ

Dharashiv Rain: धाराशिवच्या चार तालुक्यांत मुसळधार पाऊस; पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार तडाखा

SCROLL FOR NEXT