Devendra Fadanvis answer to NCP Ajit Pawar questions maharashtra politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्तर, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शिदें सरकरवर टीका अनेक प्रश्न उपस्थित केले होते, यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या टीकेला उत्तर देत त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

संभाजी महाराज समाधी निधी स्थगिती..

फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकरावर आरोप केला की, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातील कामावर स्थगिती आहे, त्या कामांवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. दादांसारख्या (अजित पवार) व्यक्तींनी तरी फाईलवर काय लिहीलंय ते पाहावं.. मी माझ्या हस्ताक्षरात लिहीलं आहे की, या कामाला स्थगिती देणं योग्य राहणार नाही, उलट या संदर्भात काय कामं हातात घेतलीयत, त्या कामांचं एक सादरीकरण माझ्या समोर आणि मुख्यमंत्रीमंत्र्यांसमोर करावं, त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचा देखील त्यात समावेश करता येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या खात्याच्या रिव्ह्यू..

मविआ सरकारच्या काळातील आदित्य ठाकरे यांच्या खात्याचा रिव्ह्यू केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलतना फडणवीसांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांचे प्रोजेक्ट वगैरे काही नाही, शेवटी जेव्हा सरकारचं समर्थन संपलं तेव्हा सरकरने ४०० जीआर काढले. जीतका पैसा नाही त्यापेक्षा पाचपट पैसा वाटला. अशाने सरकारचा भट्टा बसेल, सरकारच्या तिजोरीवर भार पडेल, त्यामुळे रिव्ह्यू आम्ही करू. एकटं पर्यटन विभागाच्या विरोधात नाही. आदित्य ठाकरे यांचं खातं म्हणून नाही सगळ्यांचा रिव्ह्यू यावेळी केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मागणीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पावसाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला आहे, याचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. एकदम हा निर्णय करावा लागतो. ,सर्व जिल्ह्यांचे सर्वेक्षण आमच्यापर्यंत पोहचत आहेत, त्याच्यावर आधारीत निर्णय आम्ही करू. अजितदादांच्या सरकारने जो निर्णय घेतला होता त्यापेक्षा चांगला निर्णय आम्ही घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Taj Mahal: जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला जाताय? सावधान! माकडांचा धुमाकूळ, पर्यटकांवर हल्ले

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT