Devendra Fadanvsi & Sharad Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मित्र पक्षांवरील शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis On Sharad Pawar : भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असा आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांचं दुःख वेगळ असून, ते सर्वांनाच माहिती आहे असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, आमचा जो मित्र पक्ष आहे त्यांच्या सोबत 50 लोकं आहेत. आम्ही 115 लोकं असून, मित्रपक्षाला आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांची शपथ झालेली आहे. त्यामुळे पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे असं मला वाटतं आणि ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे असे ते म्हणाले.

पक्ष चिन्हावरील वादाच्या पवारांच्या विधानावर फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. त्यावेळी डिफेक्शनचे कायदे नव्हते. त्यामुळे कोणालाही कसंही बदलता येत होतं. मात्र, आज याबाबत कायदे तयार झालेले असून, त्यामुळे कायदेशीर लढाई लढाई करावी लागते. या सर्वावर शिंदे कायदेशीर लढाई करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारमधील घडामोडींवर पवार म्हणतात...

बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भाजपाने आघात केला. भाजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या फारकतीवर पवारांनी वरील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT