Devendra Fadnvis File Photo
महाराष्ट्र बातम्या

दरेकरांच्या बचावासाठी फडणवीसांनी घेतलं राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव

सकाळ डिजिटल टीम

आम्ही कोर्टात जाऊ असं सांगताना फडणवीस म्हणाले की, खड्डा खोदतो, तोच खड्ड्यात जातो.

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी दरेकरांचा बचाव करताना फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्याकडे बोट दाखवलं. फडवणीस म्हणाले की, मी कालच सांगितले होते, सरकार आता प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा कट रचत आहे. दरेकर मजूर संस्थेचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण राज्यातील कोणतीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत आणि त्यात सगळ्याच पक्षांचे आहेत. सगळ्या पक्षांचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. आपण कोणत्याही बँकेत मजूर संस्थेतून निवडून आलेल्यांची यादी बघा ते कोणत्या तरी पक्षाचे नेते आहेत. मागील वेळी आम्ही ही गोष्ट बोललो तेव्हा हे खुद्द अजित पवारांनीसुद्धा मान्य केले होते.

सुडाच्या भावनेने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, आम्ही घाबरणार नाही. आम्ही न्यायालयात जावू, आमचा आवाज बुलंद राहिल. विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारची कारवाई, आधी असं कधीच घडलं नव्हतं. याशिवाय आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणी मजूर संस्थांचे अध्यक्ष कोण आहेत. त्याची यादी देऊ. कोणावर गुन्हा दाखल करणार, हे पाहू. जर तसे झाले नाही तर सरकारविरोधात न्यायालयात जाऊ. सरकारने याबाबत आम्हाला माहिती द्यावी, तो आमचा अधिकार असल्याचं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी गुलाबराव देवकर यांचा उल्लेख करत दरेकरांच्या बचावाचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले की,"गुलाबराव देवकर हे आजही मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत." दरम्यान या प्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री उत्तर देतील असं सांगितलं.

मुंबई बँकेच्या प्रकरणात पोलिसांना लक्षात आलं की सत्तापक्षाचे लोक यामध्ये सामिल आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. प्रविण दरेकर त्या बँकेत निवडून आले आहेत. मजूर संघटनेचे अध्यक्ष झाले. गुलाबराव देवकरही त्याचे सभासद आहेत. विरोधी पक्ष बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नवीन पोलीस कमिशनर सत्तेत आल्यानंतर भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणार हे स्पष्ट आहे. आम्ही कोर्टात जाऊ असं सांगताना फडणवीस म्हणाले की, खड्डा खोदतो, तोच खड्ड्यात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT