Devendra Fadnavis Uddhav-Thackeray
Devendra Fadnavis Uddhav-Thackeray e sakal
महाराष्ट्र

मग बाळासाहेबांनी शिवसेना सडवली का?, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या जंयतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. आम्ही २५ वर्ष युतीत सडलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

सोयीचा इतिहास आणि निवडक गोष्टींचा विसर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिसला. २०१० ते २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे हे युतीमध्ये होते. त्यांनी या युतीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी युतीचा निर्णय कायम ठेवला. पण शिवसेना सडली याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर बोट दाखवताय का? बाळासाहेबांनी शिवसेनेला युतीत सडत ठेवलंय का? असं उद्धव ठाकरेंना वाटतं का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

शिवसेनेच्या आधी आमचा नगरसेवक होता. लोकसभेची निवडणूक शिवसेनेनं भाजपच्या चिन्हावर लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले. भाजपसोबत असताना शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला तर यांनी भाजपला सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला. म्हणजे हे कोणासोबत सडले, हे दिसतंय, असंही फडणवीस म्हणाले. राम जन्मभूमीच्या वेळी आम्ही लाठ्या काठ्या खात होतो. राम मंदिराचा विषय मोदींनी सोडवला. तुमचं हिंदूत्व बेगडी आहे. भाषणाच्या पलीकडे तुमचे हिंदूत्व नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

भाजप स्वतःच्या भरवशावर आपलं सरकार बनवेल आणि वेगळं लढून देखील नंबर एक भाजप आहे हे आम्ही दाखवले. 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. तुम्ही जागा लढवल्या. पण तुम्हाला लोकांनी नाकारले. राम जन्मभूमीत संघ परिवार आणि विचारातले लोक होते. राज्यातील शासनावर लक्ष द्या. राज्याची अवस्था वाईट झाली आहे. तुम्हाला चौथ्या क्रमाकाचा पक्ष बनल्याची निराशा आहे. पण ते अशी बाहेर काढू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT