Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Lokayukta Bill : आता मुख्यमंत्रीही येणार लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत; फडणवीसांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

maharashtra legislative winter session 2022 : नागपूर येथे उद्यापासून महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अगामी हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळालादेखील आणणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, अण्णा हजारे मागणी करत होते की ज्याप्रकारे केंद्रात लोकपाल विधेयक झालं तसं महाराष्ट्राचा लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे. त्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर आण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट पूर्णपणे शासनाने स्विकरला आहे . तसेच नविन लोकायुक्त कायदा करण्याच्या विधेयकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्याता मिळाली असून त्यानुसार उद्या सुरू होत असलेल्या अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचं विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधेयकानुसार पहिल्यांदाच मुख्यमंत्रांना देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आणलं जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळ देखील लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत येणार आहे असे फडणवीस म्हणाले. तसेच या कायद्यानंतर लोकायुक्त हे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे जज या लेव्हलचे राहणार आहेत. पाच जणांची लोकायुक्त समिती स्थापन होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना, हा कायदा कुणाला अडकविण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी केला नसून. अण्णा हजारेंनी या कायद्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. म्हणून जसा मसूदा त्यांची समिती मान्य करेल आम्ही त्यात कुठलाही बदल करणार नाहीत. जो मसूदा त्यांना दिला तो जशाला तसा आम्ही स्विकारला आहे असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT