Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: ''मी पुन्हा कसा येतो हे तुम्हालादेखील माहिती'', फडणवीसाचं सूचक विधान

फडणवीसांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा खळबळ

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. असं वक्तव्य फडणवीसांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Devendra Fadnavis big statement i said i will come again maharashtra politics )

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

चंदगड येथे फडणवीस बोलत होते. 'मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.' असं फडणवीस म्हणाले.

एकीकडे शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री फडणवीस असे बॅनर झळकले होते. तसेच, त्यांच्यापूर्वी धाराशिव येथे अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT