Devendra Fadnavis Elon Musk Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : "...तर भाजपाने खोऱ्याने पैसा ओढला असता"; Elon Musk ला केलं रिट्वीट

राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरुन सध्या विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगात इलॉन मस्क आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या दोघांचीही सध्या चर्चा सुरू आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलॉन मस्कला रिट्वीट केलं आहे. तसंच आपल्या विरोधातल्या 'फेक नरेटिव्ह'बद्दलही भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी इलॉन मस्कला रिट्वीट केलं आहे. यामध्ये मस्क म्हणतो, "ज्या ज्या वेळी मला कोणी विचारतं की ट्रम्प आता ट्विटरवर परत येणार का, त्या त्या वेळी मला एक डॉलर जरी मिळाला असता तरी ट्विटर पैशात खेळलं असतं. " हेच ट्वीट रिट्वीट करत देवेंद्र फडणवीस म्हणतात, " माझ्या आणि पक्षाच्या विरोधातल्या प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असता तर आज भाजपाने खोऱ्याने पैसा ओढला असता."

शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. यावरुन सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यालाच उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी फेक नरेटिव्हचा मुद्दा मांडला होता. काही लोकांनी आपल्या बदनामीचा घाट घातला आहे. अडीच वर्षांत कोणी महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नव्हतं. ही विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पण काही लोक आमच्या विरोधात फेक नरेटिव्ह सेट करत आहेत, असा आरोप काल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT