Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देणं फडणवीसांनी टाळलं; जाता जाता म्हणाले,...

संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि बंडखोर आमदारांवर सडेतोड टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. या मुलाखतीवरुन अनेक नेते ठाकरेंवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या मुलाखतीवर प्रतिक्रिया देणं टाळलंय. काय म्हणालेत ते...जाणून घ्या! (Devendra Fadnavis on Uddhav thackeray interview)

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले, "फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो. जेव्हा पुढे काही होईल तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन."

दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपा तसंच बंडखोर आमदारांवर सडेतोड टीका केली आहे. सडलेला पालापाचोळा आहे, जो आत्ता पडतोय, तो एकदा शांत झाला की सगळं सत्य समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Gautala Ghat accident news: गौताळा घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला; १३ जखमी, ७ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT