Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: पहिल्यांदाच फडणवीस झाले कॉर्नर, CM शिंदे-अजित पवारांचे जुळले सुर?

महाराष्ट्रातील जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर मतभेदाच्या चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रातील जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्येच मतभेद पाहायला मिळत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचा बचाव करत दगडफेकीनंतर लाठीचार्ज केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सरकारची परिस्थिती एका बाजूला फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे दिसत आहेत. यासंबधीचे वृत्त 'लाईव्ह हिन्दुस्तान' या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

लाठीचार्ज झाल्यानंतर अजित पवार संतापले

जालन्यातील अंतरवली गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राज्याचे गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, गावातील लोकांनी आधी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी याप्रकरणी पोलिसांची भूमिका तपासली पाहिजे. निष्पक्ष तपास करून दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणीही केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहे. राज्यात मराठा समाजाची ३० टक्के व्होट बँक आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी जारी केलेल्या पत्रात आंदोलकांनी आधी पोलिसांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. लाठीचार्ज केल्यानंतर त्यांनी जखमींप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर फडणवीस सरकारमध्ये एका बाजूला पडल्यासारखे वाटत आहेत. रविवारी बुलढाण्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अजित पवार पोहोचले नाहीत. लाठीचार्जच्या घटनेनंतर ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंतरवली गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत लाठीचार्ज घटनेला तेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या घटनेनंतर भाजपच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांचीही भेट घेतली होती. त्याचबरोबर फडणवीस यांनीही फोन केला असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

मनोज जरांगे यांच्याशी सरकार चर्चा करणार

लाठीचार्ज झाल्यानंतर दोन दिवसांनी राज्य सरकारने त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान 40 पोलिस कर्मचार्‍यांसह अनेक जण जखमी झाले. त्यानंतर 15 हून अधिक राज्य परिवहन बसेस जाळण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, या हिंसाचारप्रकरणी २ हजार हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT