Devendra Fadnavis Devendra Fadnavis
महाराष्ट्र बातम्या

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शनिवारी (ता.१४) मुंबई येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी केंद्रातील मोदी सरकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केतकी चितळे, भारतीय जनता पक्षासह विरोधकांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेवर फडणवीस यांनी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला आणखी एक टोमणे बाॅम्ब, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. (Devendra Fadnavis Criticize Chief Minister Uddhav Thackeray For Public Rally)

पुढे ते म्हणतात, मुंबईची मेट्रो-३ आम्ही तीन वर्षांत ८० टक्के पूर्ण केली. एकच काम होते, जे ९ महिन्यांत पूर्ण व्हायचे होते. पण, सरकारने सर्व कामे थांबविली. पण आता पुढचे ४ वर्ष ही आशियातील सर्वांत मोठी मेट्रो खोळंबली. मुंबईकर योग्य वेळी त्यांना शिक्षा देणारच, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शिवसेनेवर केली.

बाबरी मशिद पाडण्यावरुन ठाकरे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी नुसतं मशिदीवर पाय तरी ठेवले असते तरी ती वजनामुळे पडली असती. हिंदुत्व आम्हाला शिकवू नका. ते डोक्यात राहावे लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Left Handed People Facts: तुम्ही Lefty आहात का? फक्त १०% लोकांमध्ये असतं हे खास ‘ब्रेन कनेक्शन’!

Loni Kalbhor Crime : दिराची सुटका करायची असेल तर मला शरीरसुख दे, नाहीतर त्याला जेलमध्ये सडवतो, अशी धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT