Devendra Fadnavis Criticized  Nana Patole over offensive statement about narendra modi
Devendra Fadnavis Criticized Nana Patole over offensive statement about narendra modi  
महाराष्ट्र

'नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही..'; फडणवीसांचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी या वक्तव्याचा समाचार घेत पटोले यांच्यासोबत कॉग्रेस (Congress) पक्षावर देखील ताशेरे ओढले आहेत. (Devendra Fadnavis Criticized Nana Patole over offensive statement about narendra modi)

फडणवीस यांनी ट्विट करत काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत लिहीले की, 'पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…'

पुढे त्यांनी लिहीले आहे की, काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? असा प्रश्न त्यांनी केले आहेत. तसेच पुढे पटोले यांना धारेवर धरत, 'नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!' असा पलटवार देखील त्यांनी केला.

दरम्यान, माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. असे स्पष्टिकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील पटोले यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी यासंबंधीत अनेक ट्विट करत विधानाता कडाडून निषेध केला आहे , त्यांनी 'नाना पटोलेंनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्यावर केलेलं वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबाबत अशा प्रकारे गरळ ओकण्याची महाराष्ट्राची संस्कृती मुळीच नाही. मात्र तुमचा आणि संस्कृतीचा दूर-दूरपर्यंत संबंध असेल, असं मला वाटत नाही.' असे ट्विट केले आहे.

त्यासोबतच त्यांनी, आपले संस्कार उघडे पाडणाऱ्या पटोलेंनी मोदीजींची जाहीर माफी मागायलाच हवी. आम्ही कधीही मारण्याची भाषा करत नाही तर केवळ राष्ट्रासाठी मरण्याची भाषा करतो कारण आम्हाला अटल जी यांचे संस्कार लाभले आहेत. तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ, सामने वार कर फिर मुझे आज़मा!' असे देखील म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT