Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Google
महाराष्ट्र

जाधवांच्या डायरीतील 'मातोश्री' उल्लेखाबाबत फडणवीस म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

'जाधवांच्या कारवाईसंदर्भात आयटी विभाग चौकशी करत आहे, त्यावर मी फारस बोलणं उचित नाही'

आयकर विभागाने सलग चार दिवस शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरात छापेमारी केली आहे. यावेळी काही महत्वाचे दस्तऐवजही हाती लागले. या चौकशीदरम्यान जाधवांची (Yashwant Jadhav) डायरी आयकर विभागाच्या हाती लागली. त्यामध्ये जाधव यांनी दोन कोटी रुपये 'मातोश्री'ला दिल्याचा उल्लेख आहे. मातोश्री या म्हणजे कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या आईला पैसे दिल्याचं सांगितलं. आईला दानधर्म करण्यासाठी पैसे दिल्याचा खुलासा आहे. दरम्यान, यशवंत जाधवरील कारवाईसंर्भात अधिकची चौकशी आयटी विभाग करत आहे. त्यावर मी काय फारस बोलणं उचित नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. त्यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखाबाबत आयकर विभागच योग्य ती चौकशी करेल, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी फडणवीस म्हणाले, आयटी विभागाच्या (IT Raid) या चौकशीत नेमकी काय नोंद आहे हे पाहिलेलं नाही. मात्र आयटी विभागाने घेतलेल्या नोंदींसंदर्भात चौकशी होईल. याआधीही आम्ही सभागृहात सांगितलं होतं की, चोवीस महिन्यात ३८ प्रॉपर्टी म्हणजे कोविडच्या काळात मुंबई महापालिकेला (BMC) लुटले जात होते. त्याकाळात भ्रष्टाचारा व्यतरिक्त वेगळ काहीच नव्हत हे स्पष्ट झालं आहे. यशवंत जाधव यांच्यावरील आजच्या कारवाई यासंर्भात ते म्हणाले, याविषयी अधिकची चौकशी आयटी विभाग करत आहे. त्याच्यावर मी काय फारस बोलणं उचित नाही.

दरम्यान, यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यांच्यासह विमल अग्रवाल यांच्यावरही कारवाई झाली होती. २०१८ ते २०२२ यशवंत जाधव स्थायी समितीचा कार्यभार पाहात होते. यातील दोन वर्षांच्या काळात त्यांनी १००० सदनिका आणि ३६ इमारतींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. यानंतर तपासात जाधवांची डायरी हाती लागली आहे. यामध्ये ५० लाखांचं घड्याळ मातोश्रीला दिल्याचा उल्लेख देखील आला आहे. जाधवांच्या या दाव्याची पडताळणी सुरू आहे. बेनामी संपत्ती अॅक्ट अंतर्गत ही चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

Hardik Pandya: 'हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो, तो धोनीसारखा...' एबी डिविलियर्सचं MI कॅप्टनबाबत खळबळजनक भाष्य

Latest Marathi News Live Update : खडकवासला परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

Heeramandi The Diamond Bazar : ना सोनाक्षी ना मनीषा, 'या' व्यक्तीनं घेतलं सर्वाधिक मानधन; 'हिरामंडी' बजेट किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT