Nana Patole
Nana Patolee sakal

देश विकून, देश चालवतात ते मोठे नाहीत; पटोलेंचा भाजपला टोला

26 सार्वजनिक उपक्रम विकून देश विकायचं काम विरोधक करताहेत - पटोले
Summary

26 सार्वजनिक उपक्रम विकून देश विकायचं काम विरोधक करताहेत - पटोले

राजकीय वर्तुळात सध्या सातत्याने अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वारंवार टोलेबाजी सुरु असते. विरोधकांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे उघड केल्याने एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपावर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. जे देश विकून देश चालवतात ते मोठे नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. आज 26 सार्वजनिक उपक्रम विकून देश विकायचं काम विरोधक करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी पटोले (Nana Patole) म्हणाले, कॉंग्रेसचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये काँग्रेसचं सरकार येईल अशी मी आशा करतो. देशाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर लोकशाही धोक्यात असेल तर मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आज देशात जी सत्ता आहे, ती देशाला बरबाद करणार आहे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे काहीच न्हवतं. देशाचं पहिल बजेट आलं ते केवळ 350 कोटींचं होतं. आपल्याकडे सगळ्या गोष्टींचा अभाव होता. आता विरोध करणारे त्यावेळी इंग्रजांची चाटेगिरी करत होते, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

Nana Patole
मुख्यमंत्री ठाकरे भीतीपोटी अटक करा म्हणतात - किरीट सोमय्या

पुढे ते म्हणाले, काँग्रेसने (Congress) आम्हाला काही नाही दिलं असे नवीन पिढीला वाटतं. नव्या पिढीला नवीन सरकार काहीतरी वेगळं करेल असे वाटले, मात्र आताची स्थिती वेगळी आहे. गरीब आणि मध्यम वर्गाची कोरोना काळात झालेली दयनीय परिस्थिती पाहिली आहे. देश विकणाऱ्यांपासून काँग्रेसच देशाला वाचवत आहे. 136 दिवसांसाठी 5 राज्यांच्या निवडणुका चालल्या मात्र तेव्हा डिझेल, गॅसचे भाव वाढले नाही. मात्र निवडणूकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे पेट्रोल वाढले. यावेळी प्रधानमंत्रीनांनी जनतेबद्दल बोलायला हवे, मात्र त्यांनी भाषण सुरु केलं, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मागली काही दिवसांपूर्वी काश्मीर फाईल्स चित्रपट आला. यामध्ये जितकं खोट दाखवता आलं तितकं दाखवलं आहे. चित्रपट बनवणाऱ्याने पैसे कमावले आहेत. आज देशाचे प्रधानमंत्री (PM Modi) सिनेमाचा आनंद घेत आहेत. मला केवळ 1 महिना द्या, मी सगळी परिस्थिती सुधारेन. येत्या काळात येणारा आवाज हा महाराष्ट्रमधून असेल आणि तो पुढे देशभरात पोहोचेल. मला केवळ एक महिन्याचा कालावधी द्या, मी सगळी परिस्थिती सुधारेन. असं वातावरण बनेल की अनेक रोगांचा इल्लाज होईल, असेही ते म्हणाले आहेत.

Nana Patole
सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं - चंद्रकांत पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com