MVA Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र नव्हे 'मद्यराष्ट्र' माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

किराणा दुकानातंच मिळणार आता वाईन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सुधीर काकडे

राज्यात लवकरच किराणा दुकानात वाईन (Wine) मिळणार आहे. गहू, तांदुळ किंवा इतर किराणा सामानाप्रमाणे तुम्हाला वाईन सुद्धा किराणा दुकानात सहज उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने (MVA Government) मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर सरकारने अध्यादेश काढून घोषणा केली. त्यानंतर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. (Cabinet approves sale of wine in supermarkets)

महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू...महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. तसेच आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री (Wine Selling) केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं असलं पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे असं सरकारने अध्यादेशात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT