Fadnvis corona.jpg 
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी दिलेलं ११,५०० कोटींचं पॅकेज फसवं - फडणवीस

शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिलेली नाही

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील नुकत्याच येऊन गेलेल्या पूरबाधितांना (flood affected) ठाकरे सरकारनं (Thackeray Govt) तातडीची ११,५०० कोटींची मदत जाहीर केली. पण या मदतीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षात ही मदत खूपच तोकडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी या मदतीचं विश्लेषणही केलं आहे.

फडणवीस म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचे विश्लेषण पाहता केवळ १,५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. कारण पूनर्बांधणीचे ३,००० कोटी आणि दिलासा उपाययोजनांचे ७,००० कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते.

राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा सन २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबत आणखी स्पष्टता येईल. त्यानंतरच या मदतीवर सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही, अशी टिपण्णीही देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या पॅकेजवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Supriya Sule Video: आमच्या सिरियलवर तोडगा काढा, पैसे वाया जातात; पुणेरी आजीबाईंचा प्रश्न- सुप्रिया सुळेंना उत्तर सुचेना

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

SCROLL FOR NEXT