Devendra Fadnavis टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis News : शिंदे सरकारचा 'तो' निर्णय रद्द करण्याची फडवणीसांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १४ मार्चच्या एका शासन निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी नियुक्त संस्थांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंबंधी पत्र लिहीलं आहे.

१४ मार्च २०२४ रोजी कामगार विभागाने शासन निर्णय काढून नऊ संस्थांना मान्यता दिली होती. मात्र या संस्थाना काम देताना त्यांना देण्यात येणार वेतन आणि मानधन यावर भाजपचे आणि उपममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

१४ मार्च २०२४ रोजी कामगार विभागाने बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या ९ कंपन्यासाठी दाखवलेला खर्च व्यवस्थित नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी यावर आक्षेप घेतला, तसेच हा आदेश रद्द करण्याची मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. या कामांसाठी कंपन्यांना मिळणारी रक्कम आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मिळणाी रक्कम याबद्दल स्पष्टता नसल्याचे फडणवीस म्हणाले.

शासन निर्णयानुसार, जर असिस्टंट मॅनेजर पदावरील व्यक्तीला ६२,९०० रुपये इतकी रक्कम दिली तर कायदेशीर किमान वेतन हे सदर व्यक्तीला १८,९०८ रुपये इतके जाईल. तर ४३,९९२ इतकी रक्कम कंपनीकडे शिल्लक राहते. त्यामुळे मोठा नफा कंपनीलाच मिळेल आणि कामगाराला अत्यंत कमी रक्कम मिळेल.

यामुळेच फडणवीसांनी शासन निर्णयात याबद्दल स्पष्टता नासल्याचा आक्षेप घेतला आहे. तसेच हा शासन निर्णय रद्द करून नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT