Eknath Shinde & Devendra Fadanvis esakal
महाराष्ट्र बातम्या

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी असा आहे शिंदे फडणवीस सरकारचा प्लॅन

काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार अॅक्टिव्ह झालं आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकार अॅक्टिव्ह झालं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील अतिरिक्त पावसामुळे होत असलेल्या आपत्तीच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

(Eknath Shinde Devendra Fadnavis News)

"या बैठकीत आयुक्त आणि ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात इमारती पडण्याची शक्यता जास्त असते आणि अशा घटनाही अनेक ठिकाणी घडत असतात. त्यामुळे जुन्या इमारतीजवळ नोटीसा लावण्यात याव्यात आणि ज्या ठिकाणी नोटीसा लावल्या नाहीत त्या वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी असा आदेश देण्यात आला आहे. तसेच मनुष्यहानी टाळण्यासाठी तात्पुरते स्थलांतर करण्याचंही सांगितलं आहे." अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे आणि अन्य यंत्रणांच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर कोकणातील दरडग्रस्त ठिकाणांचा आढावा घेण्यात आला आहे. आणि ज्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली आहे त्यासाठी प्रशासनाने वेगाने बचावकार्य सुरू केले पाहिजे आणि त्यावर उपाय शोधले पाहिजेत अशा सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. जुन्या इमारतींवर नोटीसा लावल्याने इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत मनुष्यहानी टळणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. सरकारने मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक काल शपथविधीच्या काही काळानंतर घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेत आम्ही राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT