Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

‘सबका साथ सबका विकास हेच वारकरी संप्रदायाने इतके वर्ष सांगितलं’

सकाळ डिजिटल टीम

पुणे : संत तुकाराम महाराज यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करीत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच वारकरी संप्रदायाने इतक्या वर्ष सांगितले आहे. हेच आता जनतेला सांगण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

पुण्याजवळील (Pune) देहू येथील कोळी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. यादव साम्राज्य संपल्यानंतर समाज छिन्नविच्छिन्न झाला होता. समाज व्यसनाच्या आहारी गेला होता. पाप वाढले होते. यावेळी संतांनी भागवत धर्माला जागृत केले. महाराष्ट्राला जागृत केले, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रजला. याला समोर नेण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान मोदीची (Narendra Modi) काम करीत आहे. रंजल्या-गंजल्यांसाठी काम करीत आहे. गरिबांसाठी काम करीत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोरोना काळात समाजाला व्हॅक्सीन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT