Devendra Fadnavis on speculations over cm eknath shinde resignation SC Verdict on power struggle in Maharashtra
Devendra Fadnavis on speculations over cm eknath shinde resignation SC Verdict on power struggle in Maharashtra  Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : निकालाआधीच CM शिंदे राजीनामा देणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रोहित कणसे

सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. यादरम्यान वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालापूर्वी राजीनामा देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे . मात्र यादरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे पदाचा राजीनामा देणार नाहीत आणि सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

उद्याच्या निकालसंदर्भात बोलतना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "आम्ही आशावादी आहोत, कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे , त्याबद्दल अंदाज लावणं योग्य नाही. पण आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. "

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वीच राजीनामा देण्याच्या शक्यतेवर बोलताना देवेंद्र फडणवीस चिडल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस म्हणाले की, "माफ करा पण शब्द वापरतो, पण मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकणार नाही. कशाकरता राजीनामा कशाकरिता देतील.. त्यांनी काय चूक केली आहे? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू. सरकार एकदम स्थिर आहे."

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उद्या होणार फैसला

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्याच्या निकालासंदर्भात सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे" यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं 'लाईव्ह लॉ' नं म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT