Devendra Fadnavis on Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ...म्हणून मराठा समाजाचं आरक्षण 16 टक्क्यांहून 10 टक्क्यांवर आलं; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation Latest News : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता ‘आरक्षण विधेयक 2024' आज (मंगळवारी) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

रोहित कणसे

Devendra Fadnavis on Maratha Reservation : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता ‘आरक्षण विधेयक 2024' आज (मंगळवारी) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

यादरम्यान राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला यापूर्वी देण्यात आलेलं 16 टक्के आरक्षण 10 टक्क्यांवर कसं आलं? याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. मराठा समाडाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर विधानभवन परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी याबद्दलचे स्पष्टीकरण दिले.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री असताना १३ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं आता १० टक्के देण्यात आलं आहे. दिवसेंदिवस ही टक्केवारी कमी होत आहे. मग पुढे हे टीकेल की नाही? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 16 टक्के जे आरक्षण दिलं ते न्यायालयाने नाकारलं. पुन्हा आपण १६ टक्के दिलं होतं ते न्यायालयाने 12 आणि 13 टक्के लॉजिकली केलं होतं... आता राज्य मगासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने जे निकष दिले त्यांच्या आधारे पाहाणी केली. त्या पाहणीमधून त्यांनी रिपोर्ट दिला.

शेवटी टक्केवारी ठरवताना आपल्याकडील रिपोर्टमधील निरीक्षणं आणि न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश यानुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. ईडब्लूएसला देखील ज्याप्रमाणे 10 टक्के आरक्षण देण्यात आलं, तसंच एसईबीसी (Socially and Educationally Backward Classes) ला देखील 10 टक्के आरक्षण देण्यात आलं.

फडणवीस यांनी पुढे बोलताना सांगितलं की. येथून पुढे ज्या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिराती निघतील तेथे मराठा समाजातील उमेदवारांसाठी हे 10 टक्के आरक्षण लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT