Political esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकारनं सुरज जाधवला आत्महत्येस भाग पाडलं; फडणवीसांचा आरोप

मविआ सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. दरम्यान, सरकरानेच सुरजवर आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. याविषवरून आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे.

ते म्हणाले, मविआ सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. विजतोडणीमुळे अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. याच अडचणीमुळे तरुण शेतकरी सुरज जाधव याने फेसबूक लाईव्ह करत आत्महत्या केली. मात्र या सरकराने सुरजवर आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. २३ वर्षीय सुरज जाधवने वीज कनेक्शन तोडल्याने पिकाचे नुकसान होणार या काळजीने आत्महत्या केलेल्या व्हिडिओत सरकारला कारणीभूत ठरवलं आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही टोकाचे पाऊल उचलु नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वीज तोडणी करु नये असे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना थोडे पैसे भरून मे महिन्यापर्यंतची त्यांनी सवलत दिली आहे. तरीही त्याची अमंलबजावणी सरकारकडून झालेली नाही. ठाकरे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT