Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र

"वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांनी पुन्हा दिला पेनड्राईव्ह

सुधीर काकडे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एका पेन ड्राईव्ह ब़ॉम्ब (Pen drive Bomb) फोडला आहे. फडणवीसांनी आज पुन्हा एकदा आज एक पुरावा सादर करत, महाविकास आघाडी आणि वक्फ बोर्डावर गंभीर आरोप केले आहे. या पेन ड्राईव्हमध्ये आता दोन पात्र आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदसैर लांबे, ह्यांना नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्फ बोर्डावर (Waqf Board) नियुक्त केलं असून, तो दाऊदचा (Dawood Ibrahim) माणूस असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आरोप करताना म्हटलं की, मी पेन ड्राईव्ह देतो. आता या पेनड्राईव्ह मध्ये दोन पात्र आहेत. एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरं डॉ. मुदसैर लांबे. ह्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलंय. लांबेवर यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. मग त्यांनी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. या महिलेच्या पतीने घटस्फोट दिला होता. डॉ लांबे ह्यांनी या महिलेच्या पती विरोधात चोरीची तक्रार केली अन् तो तुरुंगात गेला. डॉ लांबे आणि मोहम्मद अर्शद खान यांच्यात झालेल्या संवादात वक्फ बोर्डामध्ये पैसे कसे कमवायचे अशी चर्चा सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय? फडणवीसांनी वाचून दाखवला संवाद

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम... मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दारुद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान: अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT