महाराष्ट्र बातम्या

'मोबाईलवरील एक फोटो म्हणजे पंचनामा नव्हे'

अर्चना बनगे

सांगली : जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) कृष्णाकाठच्या गावांची पाहणी करत आहेत. वाळवा येथील अंकलखोप (Ankalkhop) येथे  देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी फडणवीस म्हणाले, या पुरामुळे आणि कोरोनामुळे बारा बलुतेदार उध्वस्त होत आहेत. तसेच मागच्या वेळी सारखी मदत कशी मिळेल त्यासाठी सरकार कडे प्रयत्न करू. सरकारने पंचनाम्याच खूळ मागं लावलं आहे. पण यंत्रणा पोहचली नाही. नुसता मोबाईल वर एक फोटो काढावा आणि मोबाईल वरील एक फोटो पंचनामा समजावा. असा टोला महाविकास आघाडीला लगावला.

वाळवा याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदि भाजपा नेते उपस्थित होते.

तुम्हीच मुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला न्याय द्या

यावेळी त्यांनी वाळवा येथे पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेतल्या. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करावेच लागेल. मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही मागणी करू.असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच एका पीडित पूरग्रस्तांने आपल्या व्यथा मांडत तुम्हीच मुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला न्याय द्या अशी भावना व्यक्त केली. याठिकाणी असणाऱ्या पूरबाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच राज्य सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी भाजपा आग्रही असेल. केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली असून पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये,या संकटातून बाहेर पडाल.असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

वाळवा येथून देवेंद्र फडणवीस हे पलूस तालुक्यातील अंकलखोप याठिकाणी रवाना झाले असून अंकलखोप , भिलवडी आणि मिरज तालुक्यातील ढवळी यासह सांगली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Tragedy: मेट्रो स्लॅब कोसळल्याने ठाणे–मुंबई वाहतूक ठप्प, एकाचा मृत्यू; 3 ते 4 जखमी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव! टँकरला भीषण आग, चालक जळून खाक

Devgad Hapus : देवगड हापूसचा मोहोर काही दिवसांत काळवंडला; हवामान बदल की अज्ञात संकटाने बागायतदारांच्या आशा हिरावल्या?

Somvati Amavasya 2026: यंदा सोमवती अमावस्या कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mumbai: मुलुंडमध्ये मोठी दुर्घटना! मेट्रोचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, 3 ते 4 जखमी; तर अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT