Devendra fadnavis, Ravi Rana, Navneet Rana  
महाराष्ट्र बातम्या

हनुमान चालिसासाठी जेलमध्ये राहिलेल्या राणा दाम्पत्याचा अभिमान; फडणवीसांकडून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अमरावतीत आज दहीहंडी पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेता गोविंदा देखील उपस्थित होता. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी या दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस यांनी राणा दाम्पत्याचे कौतुक केलं. (Devendra Fadnavis news in Marathi)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील दोन वर्षे बंदीस्त होतो. आता सर्व उत्सव जल्लोषात साजरे होणार आहे. आता आपलं सरकर आलं आहे. हनुमान चालिसा म्हटल्याने कोणालाही जेलमध्ये टाकणार नाही. याउलट हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारे सरकार आले आहे.

राज्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांचं अभिनंदन करतो. रावणाला लाजवेल, अशी कृती महाराष्ट्रात झाली. हनुमंताचा जयजयकार करणं महाराष्ट्रात कठिण झालं होतं. त्यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात उतरले. आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय राहणार नाही, असं राणा दाम्पत्याने ठणकावून सांगितलं. असही फडणवीसांनी म्हटलं.

हनुमान चालिसा म्हणत म्हणत रवी राणा आणि नवनीत राणा 14 दिवस जेलमध्ये राहिले. यांचा मला अभिमान आहे, अशा शब्दात फडणवीसांनी राणा दाम्पत्याचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT