Devendra Fadnavis and Sanjay Raut टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

"शेर कभी गिधडो के धमकीसे डरा नही करते"

राऊत सध्या विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, अशी धमकी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आमची करमणूक झाली अशी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आमची करमणूक झाली. यापेक्षा या वक्तव्याकडे पाहता येत नाही. रोज सकाळी 9 वाजत करमणुकीचा एक एपिसोड संजय राऊत करत असतात, त्यामुळे यावर फार काही असे बोलावे असे वाटत नाही.”

शेर कभी गिधडो के धमकीसे डरा नही करते, असा टोला सुध्दा फडणवीसांनी संजय राऊतांवर लगावला. सोबत राऊत सध्या विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे, असेही फडणवीस म्हणाले. भाजप (BJP) महाराष्टमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल आणि आम्ही पूर्ण शक्तीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT