Devendra Fadnavis reaction to Governor Koshyari  e sakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही राज्यपालांचं भाषण का ऐकावं? - देवेंद्र फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर राज्यपालांनी (Governor Koshyari) सभागृहातून काढता पाय घेतला. यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही राज्यपालांचं भाषण का ऐकावं? असं फडणवीस म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी सरकारच्यावतीने भाषण करण्यासाठी आले होते. त्यामुळे सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करताय. पण हे दाऊद समर्पित सरकार असताना आम्ही तुमचं भाषण आम्ही का ऐकायचं? असं सदस्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, हीच मागणी सर्व सदस्यांनी सर्वांनी केली, असं फडणवीस म्हणाले.

सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांचा अपमान - फडणवीस

राज्यपाल सभागृहात राष्ट्रगीतावेळी उभे राहिले. पण, सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल राष्ट्रगीताला न थांबता निघून गेले. याला सत्ताधारी जबाबदार आहेत. सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांचा अपमान केला, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला.

मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न; हे दाऊद समर्पित सरकार - फडणवीस

मलिकांनी कवडीमोल भावात जमीन घ्यायची आणि जमिनीचा ताबा मिळवून दिल्याबाबत दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. मुंबई अस्थिर करण्यासाठी दाऊदला दिलेला पैसा वापरण्यात आला. आता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याचप्रकरणात मंत्री नवाब मलिकांना अटक झाली आहे. त्यांना जर सरकार समर्थन देत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे, असं आम्ही म्हणू. संजय राठोडांचा लगेच राजीनामा घेतला. पण, नवाब मलिकांना का वाचवण्यात आलं आहे. राज्यपालांचं अभिभाषण असेल किंवा सभागृह असेल प्रत्येकवेळी आम्ही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. नाना पटोले असंही म्हणू शकतात, की आम्ही दाऊदचे समर्थक आहोत. पण, आम्ही दाऊदच्या माणसांना पाठिंबा देऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT