Devendra Fadnavis on MNS BJP Alliance e sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप-मनसेची युती कधी होणार?, फडणवीस म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या राज ठाकरे आपल्या सभांमधून भाजपचे (BJP) कौतुक करताना दिसत आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देखील कौतुक केले होते. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी आणखीच जोर धरला. मनसे आणि भाजपची (MNS BJP Alliance) युती कधी होणार? असा प्रश्न आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विचारण्यात आला.

मनसे आणि युतीच्या बातम्या परसविण्यात आल्या आहेत. या बातम्या कपोलकल्पित आहेत. आमची कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. कोणताही प्रस्ताव नाही. अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका भाजपच्या देखील भूमिका आहेत. आम्ही ज्या भूमिका मांडतो त्याच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इंधनदरवाढीवरून सरकारवर टीका -

राज्य सरकारचा दृष्टीकोण अतिशय लघू आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या सरकारला उघडं पाडलं आहे. सरकारने १ लाख २० हजार रुपये इंधन दरावरील कर कमावला. दर कमी करण्याची वेळ आल्यानंतर वेगवेगळे बहाणे केले जात आहेत. देशातील भाजपशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. गुजरातमध्ये १५ रुपयांनी दर कमी आहेत, असा निशाणा फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला आहे.

'खोटारडेपणा बंद करा' -

जीएसटीचे पैसे यायचे आहेत, असं सरकारने म्हटलं आहे. पण, वित्त राज्य मंत्र्यांनी जीएसटीच्या पैशांबाबत आकडेवारी दाखवत दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. या सरकारने बहाणेबाजी बंद केली पाहिजे. तत्काळ पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

'सेक्युलर पक्ष जातीयवादाला जबाबदार'

देशातील जातीय परिस्थिती आणि सांप्रदायिकतेचे जनतेचे जनक श्युडो सेक्युलर पक्ष आहेत. त्यांनी लांगुलचालनाच्या माध्यमातून देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांची दरी तयार केली आहे. अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करून दुर्भावना तयार केली आहे. मोदींच्या योजना सर्वांना लागू आहेत. ते जाती-धर्मात भेदभाव करत नाहीत. पण, काही पक्ष अल्पसंख्यकांचं लांगूलचालन करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT