Devendra Fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चौकशी होत नाही? यावर देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले...

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत ते बहुतांश विरोधी पक्षांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याविरुद्ध तपास मंदावला आहे, अशी तक्रार देशातील विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी  थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह ९ नेत्यांनी पत्रावर सही केली आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. जे गैरमार्गाने पैसे कमावतात. त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. असे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे. भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा, हे सगळ बंद केले पाहीजे. 

भाजपमध्ये आल्यावर कुणाचीही कारवाई बंद झाली नाही, असे असेल तर विरोधकांनी उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहे. तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT