Devendra Fadnavis  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"संजय राठोड, अनिल देशमुखांचा राजीनामा, मग मलिकांचा का नाही?"

Assembly Budget session 2022 : देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप यावेळी केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis LIVE : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी ही कारस्थानं केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेते गिरीष महाजन यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना मोकामध्ये कसं अडकवायचं याचे ड्राफ्ट सरकारी वकिलांनी करुन दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसंच दाऊद इब्राहीमशी संबंधीत लोकांवर केलेल्या कारवाईवरुन देखील फडणवीसांनी काही आरोप केलेत.

  • देशाच्या शत्रूशी व्यवहार करणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार नसताना राजीनामा घेतला. मग नवाब मलिकांचा का घेतला नाही? त्यांना वेगळा न्याय आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.

"मुंबईत स्फोट घडवणाऱ्या दाऊदशी मलिकांचा व्यवहार"

1993, 2005, 2008 साली मुंबई हादरली. प्रत्येक हल्ल्याचं कनेक्शन दाऊदपर्यंत गेलं दाऊद पाकिस्तानात, त्याला पाकने संरक्षण दिलं. तिथं बसून तो कारवाया करतोय. हसीना पारकार, इब्राहिम कासकर यांना पुढे ठेवून याठिकाणी रिअल इस्टेटचे व्यवहार करायचे. यातून पैसा उभा करायचा तोच पैसा बॉम्बस्फोटासाठी, स्लीपर सेल तयार करण्यासाठी वापरायचा. आपल्याच देशात दहशतवादी कृत्य करण्यास दाऊदने सुरुवात केली. या प्रकरणात नवाब मलिकांचा संबंध दिसून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. नवाब मलिकांनी ३ एकर जागा दाऊदच्या कुटुंबीयांनी विकली. नवाब मलिकांनी ती खरेदी केली असा आरोपही फडणवीसांनी केला.

पोलीस आणि सरकारी वकिल या सर्व प्रकरणात सहभागी असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असं फडणवीस म्हणाले.

  • अजित पवार सपोर्ट करत नाहीत पण...

    अजित पवार सपोर्ट करत नाहीत पण बड्या साहेबांचा या सपोर्ट आहे. सरकारी वकील रेड करणाऱ्यांना सांगतात की रोख पैसे द्या. यासाठी मदत लागली तर खडसेंची मदत घ्या असे निर्देश प्रवीण चव्हाण यांनी दिले आहेत. षडयंत्र म्हणतो ते महत्त्वाचं आहे. ब्लड लावून ठेवलं असतं आणि चाकू जप्त केला असता, एक चाकू विकत घ्यायचा आणि जोपर्यंत चर्चा सुरु आहे तोवर फेकायचा आणि जप्त करायचा. अनेकांनी माझ्या नावाची शिफारस केली आहे. दिलीप बोरले, वळसे पाटील , आव्हाड, मुश्रीफ, गुलाबराव आणि गुलाबराव युट्यूब, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत पत्रे पाठवली. या सर्वांनी साहेबांना पत्र दिली. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डिजींना भेटून सीपींना काढणार. साहेबांना फोन करून मिटिंग लावली, एक दिवसात एफआयआर ड्राफ्ट केला. मी कलमे लावली पण त्यांनी काही पॅरा गहाळ केले असं प्रवीण चव्हाण बोलल्याचं फडणवीस म्हणाले. साहेबांना फोन करून मिटिंग लावली, एक दिवसात एफआयआर ड्राफ्ट केला. मी कलमे लावली पण त्यांनी काही पॅरा गहाळ केले असं प्रवीण चव्हाण बोलल्याचं फडणवीस म्हणाले.

  • सरकारी वकिलांचं कार्यालय षडयंत्र तयार करण्याचं प्रमुख ठिकाण आहे. यात पहायला मिळतं की, चाकू प्लांट करण्यापासून ते केस कशी करायची याची माहिती आहे. इतकंच काय हा प्लॅन सरकारी वकील करतोय. एफआयआर सुद्धा सरकारी वकिलांनी लिहून दिला. साक्षीदार सरकारी वकिलांनी लिहून दिले.

  • गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात बनावट केस तयार केली. त्या गुन्ह्यात गिरीश महाजनांना मोक्का लावण्यासंदर्भात कागदपत्रे तयार केली गेली. त्यांना न्यायालयाने दिलासा दिला.सुरस आणि चमत्कारीक कथा रचली, गृहमंत्री महोदय राज्य सरकार काय कारस्थान करतंय. कत्तलखान्याची कथा, विरोधकांची कत्तल कशी करायची याचे षडयंत्र शिजतंय. प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण आहे. सुरेश जैन, डीएसके, महेश मोतेवार यांसारख्या केसेसमध्ये प्रविण चव्हाण सरकारी वकील यात सहभागी आहेत. कथा मोठी आहे, इतकं मटेरियल आहे की २५ ते ३० वेबसिरीज तयार होती. हे कथानक सत्य घटनेवर आधारीत आहे. याच्याशी संबंधित घटनेचा व्हिडिओ मी अध्यक्षांकडे दिला आहे असं फडणवीस म्हणाले.

  • आपण म्हणतो की देशात लोकशाही आहे, महाराष्ट्र पुरोगामी आहे , इथल्या राजकीय संस्कृतीत आपण एकमेकांचे विरोधक आहे हे विसरू नये. देशातील काही राज्ये आहेत तिथे दोन पक्षाचे लोक विरोधक आणि सरकारमधील लोकं एकमेकांसमोर उभा राहत नाहीत.

  • महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे, देशात कायद्याने काम करणारं पोलिस दल महाराषट््रातलं आहे. ही ख्याती देशभरात आहे. पण अलिकडच्या काळात पोलिस दलाचा गैरवापर केला जात असल्याचा आऱोप फडणवीस यांनी केला.

  • सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर लोकशाहीला योग्य नाही. मग या लोकशाहीत ज्या उद्देशाने बाबासाहेंनी लोकशाही दिली तो उद्देश यशस्वी होऊ शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT