Devendra Fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये; अजित पवारांनी दरडावलं

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar News : कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. तर अजित पवार यांनीदेखील त्यांच्या शैलीत देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमधील सभेतून केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

कोण पार्सल आहे हे देवेंद्र फडणवीस यांना निपाणीतून सांगेन. मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे? या सगळ्या संदर्भात मी तिथे बोलणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निपाणीत गेल्यानंतर शरद पवार फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष आहे.

याच मुद्द्यावरुन अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी, फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याची गरज नाही असा टोला लगावला आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकारला धोका नाही, असं सांगावं लागतं. मात्र परिस्थिती वेगळी आहे. अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली माहिती निराळी असल्याचं सांगून अजित पवारांनी खळबळ उडवून दिली.

काय म्हणाले अजित पवार?

  • प्रत्येक सरकार धोका नाही, असंच सांगतं

  • परंतु अधिकाऱ्यांकडून मिळत असणारी माहिती वेगळी आहे

  • निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न कर्नाटकात सुरु आहे

  • देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्यीच गरज नाही

  • समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करु नये

  • सरकारने दर्जेदार कामांची बिले काढायला पाहिजेत

  • राज ठाकरेंचं ट्विट गांभीर्याने घेण्याची गरज नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT