devendra fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

''सी असो की झेड असो! देशात फक्त मोदीजींची हवा, त्यामुळे आम्ही...'', C Voter च्या सर्व्हेवर फडणवीस स्पष्ट बोलले

नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीला फटका बसू शकतो, असं बोललं जातंय.

संतोष कानडे

मुंबईः नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीला फटका बसू शकतो, असं बोललं जातंय. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी महायुतीला मागे टाकू शकते. राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यावर फडणवीसांनी मत व्यक्त केलं.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ए व्होटर असो, बी व्होटर असो, सी असो की झेड व्होटर असो.. मी सगळ्या सर्व्हेंचा सन्मान करतो. मात्र देशात फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवलंय, मोदीजींनाच मत द्यायचं. त्यामुळे आम्ही लोकसभेत आम्ही ४०च्या पुढे जागा जिंकणार आहोत.

सर्व्हेनुसार राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर इंडिया आघाडीला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर एनडीएला 37 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या सर्व्हेवरुन अनेक पक्षांचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. इच्छूकांनी श्रेष्ठींकडे दौरे करण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष आणि आघाड्या आमचा विजय होईल, असं सांगत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंड होऊन दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत आहेत. उर्वरित पक्षांचा प्रभाव मतदारांवर किती पडतो, हे पाहाणंदेखील महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Alandi Traffic Issue : आळंदीत बेशिस्त पार्किंग व नियोजनाअभावी वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

Chakur Robbery Case : महामार्गावरील दरोडा प्रकरणाचा उलगडा; एक आरोपी जेरबंद, १७.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

SCROLL FOR NEXT