Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

"त्यावेळी मी शॉक होतो, मला शिपाई बनवले तरी..."; उपमुख्यमंत्री पदाबाबत फडणवीस पहिल्यांदा बोलले

Sandip Kapde

Devendra Fadnavis : नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिली होती की देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र. आता तेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत का?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. ते एका मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला भाजपने मुख्यमंत्री बनवले होते. देवेंद्र फडणवीसांचे अस्तित्व भाजपमुळे आहे. जर भाजप हटली तर माझे काहीही अस्तित्व नाही. माझ्या पक्षाने माझा सन्मान केला. मला पक्षाने सांगितले शिपाई बना तरी मी तयार आहे.

शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित झाल्यानंतर फडणवीस यांनी कोणत्याही पदावर राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी संघटनेत काम करणार असल्याचे सांगितले होते. यावर फडणवीस यांनी खुलासा केला आहे.  

फडणवीस म्हणाले, मी पक्षाला सांगितले होते की असा संदेश जाईल की मी पदांसाठी लालची आहे. मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला संघटनेत काम देण्यात यावे, अशी मागणी मी केली होती.

मात्र वरते नेत्यांनी चर्चा केली त्यांनी विचार केला की युतीचे सरकार आहे. हे सरकार चालवण्यासाठी अनुभवी नेता हवा. त्यासाठी त्यांनी मला उपमुख्यंत्री होण्यासाठी आदेश केला. त्यावेळी मी शॉक झालो होतो. कारण माझी मानसिकता वेगळी होती. मात्र माझ्या नेत्यांचा निर्णय योग्य होता, असे फडणवीस म्हणाले.

२०२४ मध्ये काय होणार?

देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली.

कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात. असं फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT