Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : "त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली अन्..." ; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?

सकाळ डिजिटल टीम

आज धुलिवंदन आहे, देशभर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनातील द्वेष विसरून एकमेकांना रंग लावण्याचा हा दिवस आहे. राजकीय धुलिवंदन देखील आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील धुलिवंदनाचा आनंद घेतला. 

आज धुळवडीच्या दिवशी विरोधकांना माफ केलं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मित्रांना कुणीतरी भांग पाजली होती, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते मित्र कोण होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी विधानसभेत सांगितले होते की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला त्या सर्वांचा आम्ही बदला घेणार आणि आमचा बदला हा आहे की आम्ही या सर्वांना माफ केले. मागच्या काळात काही आमचे मित्र आहेत त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली. त्यानंतर दिवसभर ते गाणे म्हणत होते कुणी रडत होत. हे सर्व पाहून मजा आली पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की असा नशा केल्यापेक्षा भक्तिचा नशा करावा, कामाचा नशा करावा"

ठाणे शहरातील किसन नगर विभागातील शिवसेना शाखेत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जुने मित्र, सहकारी आणि शिवसैनिकांच्या साथीने रंगपंचमीचा सण  आनंदात साजरा केला. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर साजरी होणारी ही त्यांची पहिलीच रंगपंचमी आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT