Andhare_Fadnavis_MuktaiNagar 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: सभेची काळजी घेता येत नसेल तर फडणवीस...; अंधारेंची कठोर टीका

मुक्ताईनगरमधील सभेवर बंदी आणल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची सभा होती. या सभेवरही पोलीस प्रशासनाकडून आज बंदी आणण्यात आली. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis unable to take care of people harsh criticism by Sushma Andhare)

अंधारे म्हणाल्या, मुक्ताईनगरमधील नियोजित सभेवर सरकारकडून आकसबुद्धीनं, सत्तेचा गैरवापर करत, दरारा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असून हे वाईट आहे. कारण आमच्या सभेत असंविधानिक काहीही होणार नाही, आम्ही अत्यंत संयत भाषेत फक्त आणि फक्त कायदा काय आहे, महापुरुषांचा विचार काय आहे, संतवचन काय आहे, महाराष्ट्र कशा पद्धतीनं जोडता येईल तसेच महाराष्ट्राच्या समस्या काय आहेत? या संबंधानं फक्त लोकांशी जाऊन बोलत आहोत.

हे ही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

ही घटनेची पायमल्ली आहे. सभा स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य हा माझा अधिकार आहे, तो मला मिळालाच पाहिजे. ग्रामीण भागात दंगलीचा इतिहास नाही. पण पोलिसांना तसं वाटत असेल तर त्यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पण ते त्यांच्याकडून होत नसेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत आहेत त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही, अशा शब्दांत अंधारे यांनी कठोर टीका केली आहे.

आमच्या सभेचा धसका घेण्याची गरज नाही. सरकार ज्या पद्धतीनं घाबरतंय ते पाहता आमची सभा नाकारण्याला मी पॉझिटिव्ह अर्थानं घेते. बहुतेक सरकार खूप घाबरलंय, अस्वस्थ झालंय, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : पूरग्रस्त पंजाब दौऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे; दुधन गुजरन गावात दिलं त्वरित मदतीचं आश्वासन

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT