esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat | 'बघताय का सामील व्हा'; शिरसाटांना पाहून महाविकासआघाडीची घोषणाबाजी

धनश्री ओतारी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पाहताच महाविकासआघाडीने घोषणाबाजी करत 'बघताय का सामील व्हा' असे आवाहन केलं.(Dhananjay Munde And Shivsena Chanting In Vidhanbhavn Area Against Sanjay Shirsat)

संजय शिरसाट विधानभवनाच्या जवळ आले. त्यावेळी महाविकास आघाडीतील आमदारांनी शिरसाटांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संजय शिरसाट यांना बघून,'बघता काय सामील व्हा' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. नेमक्या त्याचवेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत उभे होते. दरम्यान, त्यांनी शिरसाटांना पाहिलं आणि 'अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', असे शिरसाटांचे समर्थन करणारी घोषणा दिली.

पायऱ्यांवर आक्रमक आंदोलनादरम्यान मुंडेंची ही घोषणा लक्षवेधी ठरली.

त्यानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार विधानभवनापाशी पोहोचले तेव्हा मात्र शिवसेना आक्रमक होताना दिसली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी,'आले रे आले, गद्दार आले', '५० खोके आले आले', अशा घोषणा दिल्या. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT